Mumbai Local | सर्वसामांन्यांच्या लोकल प्रवासासाबाबत आरोग्यमंत्री Rajesh Tope काय म्हणाले?

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सर्वसामांन्यांच्या लोकल रेल्वे प्रवासाबाबत (Mumbai Local Travel) माहिती दिली आहे.

Updated: Jul 29, 2021, 05:46 PM IST
Mumbai Local | सर्वसामांन्यांच्या लोकल प्रवासासाबाबत आरोग्यमंत्री Rajesh Tope काय म्हणाले?  title=

मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचं (Maharashtra Corona) आगमन झाल्यानंतर  काही महिन्यांचा अपवाद वगळता सर्वसामांन्यासाठी लोकल रेल्वे (Mumbai Suburban Railway) बंदच आहेत. राज्यात सध्या शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वे सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची आज (29 जुलै) टास्क फोर्ससोबत (Task Force) बैठक पार पडली. यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सर्वसामांन्यांच्या लोकल रेल्वे प्रवासाबाबत माहिती दिली आहे. (We will talk to the railway administration in next 2 3 days and consider starting mumbai local travel says health minister rajesh tope)

टोपे काय म्हणाले? 

"रेल्वे प्रशासनाशी येत्या 2-3 दिवसांमध्ये बोलून  लोकल प्रवास सुरु करण्बाबतचा विचार होईल. तसेच मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील", असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लसवंतांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाकडूनही आल्या आहेत, असंही राजेश टोपे यांनी बुधवारी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता येत्या 2-3 दिवसांमध्ये सर्वसामांन्यासाठी रेल्वे खरचं 'ट्रॅक'वर येणार की आणखी प्रतिक्षा करावी लागणार, हे लवकरच समजेल.