शाळा सुरू करण्याबाबत काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड?

विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.

Updated: Sep 24, 2021, 06:01 PM IST
शाळा सुरू करण्याबाबत काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड? title=

मुंबई: विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. येत्या चार ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात 8 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. 

पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात वर्ग भरवावे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा यासारख्या अनेक नियमावली लागू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करताना शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी काही नियम पाळयचे असल्याचं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. 

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड
एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात यावा. दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर ठेवावे. एक वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसवावे. विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षण असल्यास घरी पाठवून लगेच कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळेचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

शाळांचे वर्ग टप्प्याटप्प्याने भरवावेत. शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा. शाळा सुरू करण्यासाठी पालिका आणि ग्रामीण स्तरावर समिती गठीत कराव्यात असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.