close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने दिले तर काय बिघडले- उदयनराजे भोसले

गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला माध्यमांनी चुकीचे वळण दिले.

Updated: Oct 15, 2019, 10:17 PM IST
गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने दिले तर काय बिघडले- उदयनराजे भोसले

मुंबई: राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देण्यात काय गैर आहे, असा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. उलट त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, असे उदयनराजे यांनी सांगितले. 

उदयनराजे भोसले यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला माध्यमांनी चुकीचे वळण दिले. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभारच लागेल. मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मला हे धोरण समजावून सांगितले. मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. आपण देवळात लग्न नाही लावत का?, असा प्रतिप्रश्नही उदयनराजे यांनी केला. 

मोदी राहुल गांधींसारखे वागायला लागलेत- प्रकाश आंबेडकर

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील २५ किल्ल्यांची निवड केली होती.  किल्ले ६० ते ९० वर्षांसाठी करारावर दिले जाऊ शकतात. या किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र, या प्रस्तावाला जोरदार विरोध झाला होता. हे प्रकरण शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. यानंतर सरकारने हा प्रकल्प बासनात गुंडाळला होता. मात्र, आता खुद्द छत्रपतींच्या वंशजाने सकारात्मक भूमिका घेतल्याने सरकारला पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे.

छत्रपती उदयनराजे पवारांच्या आठवणीने रडले आणि म्हणाले...