close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वन्यप्राणी आढळल्यास काय कराल?

प्राणी वाचविणे हाच मुख्य उद्देश असतो.

Updated: Aug 17, 2019, 07:49 PM IST
वन्यप्राणी आढळल्यास काय कराल?

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर : नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा मानवीवस्तीमध्ये अनेक वेळा वन्यप्राणी अडकतात. अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे? कशाप्रकारे प्राण्यांना रेस्क्यू केलं जातं? यांची कार्यशाळा भोर वन विभागाकडून घेण्यात आली. 

Image preview

वन्यप्राणी ज्यावेळी अडकलेल्या परिस्थितीत असतात, त्यावेळी ते नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे घाबरलेले किंवा आक्रमक झालेले असतात. त्यांना शांत करून रेस्क्यू करणं जोखमीचं काम असतं. चारही बाजूने होणारी बघ्यांची गर्दी आणि गोंधळामुळे वन्यप्राणी बिथरतो. अशा वेळी त्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम तणावाखाली येते. 

प्राणी कोणत्या स्थितीत आहे? हे ओळखून योग्य बेशुद्ध होण्याचे औषध देणं गरजचं असतं. अशा वेळी प्राणी वाचविणे हाच मुख्य उद्देश असतो.

काय करावे?

सर्वप्रथम अडकलेल्या प्राण्याची माहिती वनविभागाला कळवणे

प्राण्यापासून लांब राहणे 

व्हिडिओ, फोटो, दगड मारणे, आरडाओरडा करणे अशा गोष्टी न करणे

रेस्क्यू टीम, वन विभाग, पोलीस यांच्या सुचनेचे पालन करावे 

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे काम फक्त रेस्क्यू टीम किंवा वन विभागाचे नसून, ही सर्वांची जबाबदारी आहे. हेच या कार्यशाळेत सांगण्यात आलं. तसंच काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. त्यामुळे वनविभाग कर्मचाऱ्यांना या कार्यशाळेचा उपयोग होणार असून रेस्क्यूविषयही नेमकी माहिती देण्यात आली. कार्यशाळेसाठी वन्यजीव रक्षक डॉ. अजित देशमुख तर सह्याद्री रेस्क्यू टीम सचिन देशमुख यांनी मार्गदर्शन केले.