मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातील आपला जामीन अर्ज मागे घेण्यापूर्वी एक सुचक ट्विट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे फोटो पोस्ट केले आहेत.
देशात २०१० साली काँग्रेसचे सरकार असताना पी. चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सीबीआयने अटक केली होती. तर, २०१९ साली देशात भाजप सरकार असताना सीबीआयने माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. यावेळी गृहमंत्री अमित शाह होते.
— nitesh rane (@NiteshNRane) February 2, 2022
या घटनांची आठवण नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये करून दिली आहे. त्याचसोबत त्यांनी "समय बडा बलवान है, इन्सान खामो खा गुरुर करता है!!" अशी शायरीही पोस्ट केली आहे. नितेश राणे यांच्या या ट्विटमधून त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे आणि त्यांनी कुणाला सूचक इशारा दिला आहे याचीच चर्चा सुरु झाली आहे.