devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस का म्हणाले.. 'भारतातील सगळे एकाच बापाची औलाद'.. वाचा

भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतचे संशोधन ही ब्रिटिशांनी भारताला पारतंत्र्यात ढकलण्यासाठी वापरली, पण... 

Updated: Apr 20, 2022, 12:15 PM IST
devendra fadnavis : देवेंद्र फडणवीस का म्हणाले.. 'भारतातील सगळे एकाच बापाची औलाद'.. वाचा title=

पुणे : पुण्यात 'भाजप : काल आज आणि उद्या' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis ) यांनी एक मोठं विधान केलंय. आर्य बाहेरून आले असं सांगितलं केलं. परंतु, संशोधनातून सगळ्या भारतीयांचा डीएनए एकच आहे असं समोर आल्याचं ते म्हणालेत.

जगातील सर्वात जुनी संस्कृती भारतीय संस्कृती आहे. ऋग्वेद 9 हजार वर्षापूर्वी लिहिलं गेलं. भारतासारखी जुनी भाषा कुठेही नाही. त्यामुळेच हिंदुत्व हे भारतीय इतिहासाशी जोडलेलं आहे.

भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतचे संशोधन ही ब्रिटिशांनी भारताला पारतंत्र्यात ढकलण्यासाठी वापरली. पण, हे संशोधन खोटे ठरले. बंगालचे ब्राह्मण आणि उत्तर प्रदेशातील दलित यांचा डीएनए एकच असल्याचे एका संशोधनातून समोर आलंय. त्यामुळे भारतातील सगळे एकाच बापाची औलाद आहेत, असं फडणवीस म्हणाले. 

अनेकांनी हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. पण, भाजपने अशी कुठलीही शाल पांघरलेली नाही. आमचं खरं हिंदुत्व आहे, असा दावा करतानाच त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. तर, राज ठाकरे यांनी पांघरलेली शाल जुनी की नवी हे काळ ठरवेल असेही ते म्हणाले.