दिल्ली मुंबईतील मुलींना घेऊन देहाव्यापार चालवणाऱ्या महिलेला पकडायला पोलिसांना लावला असा ट्रॅप
Nagpur Crime News : दिल्ली मुंबई आणि इंदोर इथल्या पीडित मुलीना जाळ्यात ओढून हाय प्रोफाइल ग्राहकांसाठी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलाल महिला आणि तिच्या सहकार्याचा भांडाफोड करत अटक केली. मागील 10 ते 11 वर्षांपासून देहव्यापरात असणारी अश्विनी उर्फ स्वीटी आणि जुनेद साहिल शेखला या दोघाना पोलिसांनी अटक केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून स्वीटी ही देहव्यापार व्यवसायात मुंबई दिल्ली, इंदोर या शहरातून पैशांची गरज असणाऱ्या मुलीना हायप्रोफाईल ग्राहकांसाठी देहव्यापार चालत होती. यासाठी त्या मुलींना स्वतःच्या घरात ठेवून त्यांना हॉटेलमध्ये किंवा ग्राहकाने ठरवलेल्या ठिकाणी पाठवत असल्याचं समोर आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. पोलिसांनी यावेळी डमी ग्राहक पाठवत देहव्यापर करणासाठी 25 हजार रुपयांना सौदा केला. दलाल महिलेने वर्धा मार्गावर डमी ग्राहकाला बोलावून घेतले. अश्विनी उर्फ स्वीटीने जुनैदला दोन मुलींसह पाठवले.
पैशाचा व्यवहार होताच धाड टाकत पीडित मुलीकडून चौकशीच्या आधारे पोलिसांनी तातडीने स्वीटीच्या हुडकेश्वर येथील घरावर छापा टाकला. यावेळी घरातून सुद्धा एका पीडित मुलगी मिळून आली. अश्विनी उर्फ स्वीटी नामक महिला मागील अनेक वर्षांपासून देहव्यापारात असल्याने याचं जाळं दूरवर असण्याची शक्यता आहे. याचाही तपास पोलीस करत आहे.