महिलांनी बार सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला

अहमदनगर मनमाड मार्गावर एका व्यावसायिकाने हायवेपासून काही अंतरावर बार सुरु करण्याचा केलेला प्रयत्न महिलांनी हाणून पाडला. 

Updated: Jun 26, 2017, 11:53 AM IST
महिलांनी बार सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला

अहमदनगर : अहमदनगर मनमाड मार्गावर एका व्यावसायिकाने हायवेपासून काही अंतरावर बार सुरु करण्याचा केलेला प्रयत्न महिलांनी हाणून पाडला. 

साकुरी ग्रामपंचयात हद्दीतील बावके वस्तीवरील शेतात एका शेडचं बांधकाम असल्याची माहिती स्थानिक महिलांना मिळाली. हॉटेल भगीरथीचे मालक आढाव यांनी शेतात हे बांधकाम सुरु केलं. या बांधकामामुळे गावातल्या महिला संतप्त झाल्या. 

बारला विरोध दर्शवत महिलांनी रणरागिणीचं रुप धारण केलं आणि बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेतली. महिलांचा रौद्रावतार पाहून बारचं बांधकाम करणा-यांची तारांबळ उडाली. यावेळी काही तरी कारण देत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न बांधकाम करणा-या जागा मालकानं केला. बावके वस्ती परीसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. 

या ठिकाणी दारुची विक्री सुरु केली गेल्यास परीसरातील नागरीकांना त्रास होईल अस सांगत आता महिलांनी साकुरी गावात दारुबंदीची मागणी केलीय. त्यासाठी येत्या काही दिवसांत ग्रामसभा घेऊन दारुबंदी करण्याबाबत महिला ठाम आहेत.