टेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले

पावसाळ्यात उघड्या विद्युत वाहिन्या या धोकादायक ठरत आहेत. यातून विजपुरवठा प्रवाहित होत असल्याने या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत. 

Updated: Jul 7, 2023, 12:09 AM IST
टेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले  title=

Nashik News :  नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा जोरदार शॉक लागला आहे. यात त्या 60 टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. MSEB च्या उघड्यावर असलेल्या वायरमुळे शॉक लागला आहे. जखमी महिलेच्या कुंटुंबियांनी MSEB च्या गलथन कारभारावर संताप व्यक्त केला आहे. 

काय घंडल नेमकं?

राणी दशरथ चव्हाण असे शॉक लागून जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. राणी चव्हाण या 60 टक्के भाजल्या गेल्या आहेत. राणी दशरथ चव्हाण या मनमाड येथून वडिलांच्या घरी आल्या होत्या.  धुतलेले कपडे सुकत घालण्यासाठी राणी चव्हाण टेरेसवर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा अचानक टेरेसवरून जाणाऱ्या एमएसईबीच्या वायरचा शॉक लागला. यामुळे त्या पाच फुट लांब फेकल्या गेल्या. परिसरातील नागरिकांना आणि घरातील सदस्यांना मोठा आवाज आल्याने घरातील सर्व मंडळी बाहेर आले. 
त्यांना विजेचा जोरदार झटका बसला होता. त्यांच्या वडिलांनी तात्काळ त्यांना अशोक नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र,  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  असून राणी चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

MSEB च्या उघड्या तारा धोकादायक

MSEB च्या उघड्या तारा धोकादायक बनल्या आहेत.  अनेक दिवसांपासून याबाबत तक्रारी एमएससीबी च्या विभागाला करण्यात आल्या आहेत. मात्र, कुठल्याच प्रकारची दखल घेत नसल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं यामुळे या तारांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

शॉक लागून महिलेचा मृत्यू

वाशिम च्या रिसोड शहरातील सिव्हिल लाईन परिसरात विद्युत शॉक लागून एका 35 वर्षीय महिलेचा  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  स्वाती वायभासे असे मृत महिलेचे नाव आहे.  पावसाचे पाणी पाईप मधून पडत नसल्याने ते पाईप बसवण्याकरिता छतावर गेली होत्या.  यादरम्यान छतावरील लोखंडी जाळीमध्ये शॉक आल्याने त्यांना जबर धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.  
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x