धक्कादायक! डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेची हत्या

डोंबिवलीत भर दिवसा एका महिलेचा खून झाल्यानं एकच खळबळ उडली आहे. सुनंदा लोकरे असं मृत महिलेचं नाव आहे. 

Updated: Aug 16, 2017, 04:22 PM IST
धक्कादायक! डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेची हत्या title=

ठाणे : डोंबिवलीत भर दिवसा एका महिलेचा खून झाल्यानं एकच खळबळ उडली आहे. सुनंदा लोकरे असं मृत महिलेचं नाव आहे. 

सुनंदा लोकरे यांचा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रवींद्र मासुरेकर यांच्याशी कचरा टाकण्यावरून वाद होता. याच वादातून आरोपीनं मासुरेकरनं सुनंदा यांच्या डोक्यात रॉड घातला. त्यातच सुनंदा यांचा मृत्यू झाला आहे.