लातूर : जिल्ह्यातील उदगीर शहरातील आडत मार्केट परिसरातील देशी दारू दुकानांवर महिला आणि नागरिकांनी हल्ला करून प्रचंड तोडफोड केली.
काही दिवसापूर्वीच हे दुकान आडत मार्केट जवळील दुर्गा आर्केड येथील गृहनिर्माण सोसायटीत सुरु झाले होते. ज्याला परिसरातील नागरिक, महिला, बाजार समितीचा विरोध होता.
मात्र या विरोधात निवेदन देऊनही दुर्लक्ष केले गेले. परिणामी रहिवाशी असलेल्या ठिकाणी दुकान असल्यामुळे दुर्गा आर्केड येथील महिला आणि नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला.
महिला आणि नागरिकांनी मिळून रात्री या देशी दारू दुकानावर हल्ला चढविला. यावेळी देशी दारूच्या हजारो बाटल्या महिलांनी बाहेर फेकून देत तोडफोड केली.