यवतमाळमध्ये चालत्या बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार

 मातृत्वाला काळिमा फासणारी घटना

Updated: Jun 5, 2019, 03:00 PM IST
यवतमाळमध्ये चालत्या बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार title=

यवतमाळ : मातृत्वाला काळिमा फासणारी घटना यवतमाळमध्ये घडली आहे. पांढरकवडा आगाराच्या एका चालत्या बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार झालीय. गर्भवती महिला पांढरकवडा ते यवतमाळदरम्यान प्रसुत झाली. तिनं एका बाळाला जन्माला जन्म दिला मात्र अंधाराचा फायदा घेत बाळाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून सगळ्यांची नजर चुकवून ही महिला पसार झाली. 

वाहक-चालकांचं काम संपल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चालक-वाहक यांनी वडगाव पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी मृत बाळ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपूर्द केले. दरम्यान बाळाला जन्म देणाऱ्या आईचा शोध वडगाव पोलीस घेत आहे.