मुंबई : विधानसभेत एका वर एक पेन ड्राइव्ह देऊन सरकारवर आरोप करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 'तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का?' असा टोला लगावला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार जबाब दिलाय.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था चर्चेला उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री वळसे पाटील यांनी तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? असे विचारलंय. मी विरोधी पक्षनेता आहे आणि प्रकरणं बाहेर काढणं हे माझं काम आहे.
आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे सोशित पीडित अनेक लोक येतात. तेच ही प्रकरणे आमच्याकडे आणून देतात. त्या गोष्टी मला मांडाव्या लागतात. अजूनही काही गोष्टी बाहेर येणार आहेत. त्या या पीडितांनीच आणून दिल्या आहेत.
त्यामुळे मी एक एफबीआय काढला आहे. त्याच नाव आहे, 'फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'. येथे जे पीडित तक्रारी आणून देतात. त्यांच्या प्रकरणाची शहानिशा केली जाते आणि ती प्रकरणे मी सभागृहात काढतो असा जवाब फडणवीस यांनी दिला.