Uddhav Thackeray Aurangabad Sabha : ढेकनं चिरडायला तोफेची गरज नाही - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा.

Updated: Jun 8, 2022, 08:37 PM IST
Uddhav Thackeray Aurangabad Sabha : ढेकनं चिरडायला तोफेची गरज नाही - उद्धव ठाकरे title=

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी अनेकांवर टीका केली. ढेकनं चिरडायला तोफेची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनी आणि मातानों, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सहा महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं आहे. आणि पहिलं पाऊल टाकलं आहे ते शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगरमध्ये आलो आहे.'

'जिथे जिथे नजर जाते तिथे लोकच लोकं आहेत. आज मराठवाड्यात शिवसेनेने पहिलं पाऊल टाकलं ती आजची तारीख. १९८८ साली पहिली सभा झाली होती आज याच मैदानावर पुन्हा सभा होत आहे. इतक्या वर्षांनंतर मैदानाचा कोपरानकोपरा भरला आहे. तोच जोश आहे.'

'आपल्याकडे मैदान पुरत नाही अशी आपली ताकद वाढत आहे. थोड्याच वेळात मुख्ममंत्र्यांची तोफ धडाडणार असं सुरु होतं. पण ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. ही ढेकणं आम्ही अशी चिरडत असतो, शिवसैनिकांची शक्तीसुद्धा तिकडे वाया घालवायची नाही.'

'हिंदुत्व आपला श्वास आहे. पाणीप्रश्न मोठा आहे आणि मी जनतेला सामोरे जातोय. मला मूर्ख म्हटलं तरी चालेल. पाणीपुरवठा साठी आम्ही गेली काही दिवस काम करतोय. मी तुम्हाला वचन दिलं आहे,  पाणी मिळणारच, ही योजना अधिकाऱ्यांनी हातात दांडा घेऊन पूर्ण कराव्यात.'

'आम्ही खोटं बोलत नाही. ते आमचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? चला होऊन जाऊ द्या, कुणी हिंदुत्वसाठी काय केलं ते सांगूंया.'