तरुण शेतकऱ्याचे अपहरण केले, नंतर शेतातच आढळला मृतदेह; अहमदनगरमध्ये खळबळ

Ahmednagar Crime News: अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणाचे अपहरण करत त्याची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 16, 2023, 12:06 PM IST
तरुण शेतकऱ्याचे अपहरण केले, नंतर शेतातच आढळला मृतदेह; अहमदनगरमध्ये खळबळ  title=
young farmer kidnapped and killed over land dispute in ahmednagar

लैलेश बारगजे, झी मीडिया

Ahmednagar Crime News: अहमदनगर येथे तरुण शेतकऱ्याचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सहा जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नगर शहरापासून जवळच असलेल्या इमामपूर येथे ही घटना घडली आहे. हनुमंत आवारे असं या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 

गुरुवारी हनुमंत आवारे या व्यक्तीचे अपहरण झाल्याचा गुन्हा गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी शेंडी शिवारात हनुमंत याचा मृतदेह आढळला. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. हनुमंत यांची हत्या करून मृतदेह शेंडी शिवारात टाकल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. शेतीच्या वादातून त्याचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पोलिसांनी पुढील तपासणीसाठी हनुमंत आवारेचा मृतदेह अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यानंतर त्याची हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होणार आहे. मात्र, यावेळी हनुमंतच्या नातेवाईकांनी जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी रात्री सहा जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे खुनाची चौकशी सुरू आहे

मुरबाडमध्ये तरुणाचे दोन्ही हात मनगटापासून तोडले

मुरबाड तालुक्यात अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील देवपे गावात सुशील भोईर या 28 वर्ष तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याचे दोन्ही हात मनगटापासून तोडले आहेत. चार जणांनी सुशील भोईर या तरुणाला जंगलात नेऊन  जबर मारहाण केली त्यानंतर  तलवारीने त्याच्यावर जीवघेणं हल्ला करत त्याचे दोन्ही हात मनगटापासून वेगळे केले. जखमी सुशील भोईरवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी फरार आहेत, ही घटना पूर्व वैमन्यसातून झाली असल्याचे बालले जातेय , पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत