Crime News : आयुष्यातील शेवटची अंघोळ ठरली.. तरुणासह घडली भयानक घटना

Crime News : नदीपात्रात पाणी ओढण्यासाठी सोडलेल्या मोटरपंप चा वायर कट झाल्याने नदीत आंघोळीला गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या पाटणबोरी जवळील कोदोरी गावात ही दुर्घटना घडली. 

Updated: Apr 22, 2023, 11:58 PM IST
Crime News : आयुष्यातील शेवटची अंघोळ ठरली.. तरुणासह घडली भयानक घटना title=

Yavatmal Crime News : जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातात नाही. मृत्यू कुणाला कधी कुठे गाठेल याचा काही नेम नाही. अशीच धक्कादायक घटना यवतमाळमधील (Yavatmal ) एका तरुणासह घडली आहे. नदीमध्ये अंघोळ करताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नदीपात्रात विद्युत प्रवाहामुळे शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला आहे. तरुणाच्या या अचानक मृत्यूमुळे गावावर शोककळा सपरली आहे. तसेच नदीपात्रात सोडण्यात येणारे मोटरपंप किती धोकादायक ठरू शकतात हे अधोरेखित झाले आहे. 

नदीपात्रात पाणी ओढण्यासाठी सोडलेल्या मोटरपंप चा वायर कट झाल्याने नदीत आंघोळीला गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या पाटणबोरी जवळील कोदोरी गावात ही दुर्घटना घडली. 

अशोक कुरमेलकर असे मृताचे नाव आहे. अशोक दररोज आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर जायचा. नदीपात्रात पाणी ओढण्यासाठी सोडलेल्या मोटरपंप चा वायर कट झाला होता. यामुळे नदी पात्रात विद्युत प्रवाह प्रवाहित झाला होता.  त्यानुसार तो नदीत उतरताना पाण्याचा स्पर्श झाला. यावेळी त्याला विजेचा शॉक बसला आणि पाण्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

महावितरण विभागाला दहा कोटींची नोटीस पाठवणार

धुळे महानगरपालिकेने शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे खापर महावितरण कंपनी वर फोडल आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरात सुरळीत पाणीपुरवठा करता येत नसल्याचा शोध महानगरपालिकेने लावलेला आहे. शहरात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने, प्रसार माध्यमांमध्ये महापालिकेची बदनामी होते. त्यामुळे संबंधित महावितरण विभागाला वकीलामार्फत दहा कोटींची नोटीस पाठवण्याचे आदेश धुळे महापालिकेच्या महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिले आहेत.

शहरातील वलवाडी, नकाने, देवपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे मुबलक पाणी असताना देखील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. एकीकडे महापालिका दरमहा महावितरण ला दीड ते दोन कोटी रुपये वीज बिल अदा करत असताना वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण ला दहा कोटी रुपयांची नोटीस वाजवण्याच्या आदेश महापौर चौधरी यांनी दिले आहेत.

575 कोटींची पाणी थकबाकी

कल्याण डोंबिवली महापालिकेकडं एमआयडीसीचे  कोटींची पाणी थकबाकी आहे. माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे. अनेक भागात कमी दाबानं पाणी येत आहे तर अनेक भागात पाणीच येत नाही. पाणीपट्टी भरून पाणी मिळत नसल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत.