झी २४ तास इम्पॅक्ट : मुद्रांक विक्रेता आणि जमीन हडपणाऱ्यावर गुन्हा दाखल

 दोघांवर देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Updated: Feb 14, 2021, 02:03 PM IST
झी २४ तास इम्पॅक्ट  : मुद्रांक विक्रेता आणि जमीन हडपणाऱ्यावर गुन्हा दाखल title=

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : देवळा इथे जुन्या मुद्रांकावर छेडछाड़ करुन जमीनीची परस्पर हडपण्याप्रकरणी दोघांविरुद्ध देवळा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी प्रभारी दुय्यम निंबधकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापु वाघ आणि मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ या दोघांवर देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

दोघांनी जुन्या मुद्रांकावर संगणकाच्या सहाय्याने फेरफार करुन एकाच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या प्रकार झी २४ तासने उजेड़ात आणला होता.

याप्रकरणी आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली असून बनावट कागदपत्रे तयार करून जमीनी लाटण्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे.

जमीन लाटणाऱ्या तसेच मुद्रांक विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झाला. मात्र त्यांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कधी गुन्हे दाखल होतील ? हा प्रश्न अद्याप निरुत्तरीतच आहे.