जालना विहिरीत कोसळली कार, माय-लेकीचा मृत्यू

अत्यंत महत्वाची बातमी 

Updated: Feb 14, 2021, 12:11 PM IST
जालना विहिरीत कोसळली कार, माय-लेकीचा मृत्यू  title=

जालना :  जिल्ह्यात जामवाडी शिवारातल्या विहिरीत आज पुन्हा कार कोसळली आहे. आई, मुलीचा या अपघातात मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दोन दिवसांत विहिरीत कार पडल्याची दुसरी घटना घडली आहे.  जालन्यातील जामवाडी या ठिकाणी विहिरीत कार कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन जनांचा मृत्यू झालाय.तर 3 जणांवर उपचार सुरु आहेत.

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. आरती फांदडे आणि माही फांदडे अशी मृतांची नावं आहेत. तर तर दीड वर्षाचा मुलगा,मृत्युमुखी पडलेल्या महिलेचा पती आणि कारचालक या तिघांवर उपचार सुरुयत. हे कुटुंब वाशीम जिल्ह्यातल्या सिंगडोह गावचे रहिवासी आहेत. ते शेगाव येथून औरंगाबादकडे जात असताना हा अपघात झाला आहे.

 दोन दिवसांपूर्वी याच विहीरीत कार कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता.आज भल्या पहाटे आणखी याच विहीरीत कार कोसळून अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.