नितेश महाजन, झी मीडिया, जालना : भोकरदन येथील खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांच्या मका खरेदीसाठी नोंदणी करूनही मका खरेदी विना पडून असल्याची बातमी ६ ऑगस्ट रोजी 'झी २४ तास' ने दाखवली होती.
खरेदी विना पडून असलेल्या मकाला पावसामुळे कोंब फुटल्याची दुर्दशा 'झी २४ तास' ने दाखवली होती.या बातमीची जालना जिल्हा सहकार विभागाने दखल घेतलीय.
सहकार विभागाने भोकरदन आणि जाफ्राबाद येथील खरेदी विक्री संघाची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय चौकशी नेमली असून या समितीने खरेदी विक्री संघाच्या भोकरदन आणि जाफ्राबाद येथील कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांच्या तक्रारी वास्तव असून चौकशी अंती तथ्य समोर येईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास या समितीने शेतकऱ्यांना दिलाय.