'चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष', मराठा आंदोलक आक्रमक

आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढाऱ्याला गावात प्रवेश नाही.

Updated: Aug 26, 2018, 05:19 PM IST
'चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष', मराठा आंदोलक आक्रमक

अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अकोले तालुक्यातील आंबडचे गावकरी आक्रमक झाले आहेत. 'चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष' असा बॅनर गावाच्या वेशीवर लावण्यात आला आहे. 

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढाऱ्याला गावात प्रवेश नाही, असा फलक आंबड गावच्या तरुणांनी लावला आहे. याचा फटका गावातील स्थानिक पुढाऱ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. आंबड गावात राहणारे गिरजाजी जाधव हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी पुढारी म्हणून गावात न येता गावकरी म्हणून गावात यावे, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.