औरंगाबादमध्ये साजरा झाला आगळावेगळा वाढदिवस

वाढदिवसाच्या दिवशी येथील सर्व झाडांना फुगे लावून सजवण्यात आले होते. 

Updated: Jul 14, 2018, 05:30 PM IST
औरंगाबादमध्ये साजरा झाला आगळावेगळा वाढदिवस title=

औरंगाबाद: शहरातील पीर बाजार परिसरात नुकताच एक आगळावेगळा वाढदिवसाचा सोहळा पार पडला. हा वाढदिवस कुणा व्यक्तीचा नव्हता तर या परिसरातील झाडांचा होता. वाढदिवसाच्या दिवशी येथील सर्व झाडांना फुगे लावून सजवण्यात आले होते. तसेच येथील परिसरही स्वच्छ करण्यात आला होता. वर्षभरापूर्वी या परिसरात १०० झाडे लावण्यात आली होती. वाढदिवसानिमित्त झाडांसमोर यावेळी रांगोळ्याही काढण्यात आल्या. झाडांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ही झाडं जगवण्यासाठी ज्या लहानगण्यांनी परिश्रम घेतले त्यांनी झाडाच्या नावानं केकही कापला. अनेक अडचणीनंतरही ही झाडं तगली आणि म्हणूनच या झाडांचा हा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला. 

अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावली जातात. मात्र, त्यांना जपण्याकडे दुर्लक्षच होते.  मात्र, या ठिकाणी झाडं लावण्याचही आली आणि ती जगवण्यातही आली, अजूनही बराच पल्ला गाठायचाय. मात्र, एक चांगली सुरुवात झाल्याचा आनंद यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.