मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने गर्भधारणेवर तिचं पुस्तक लिहिलं आहे. तिच्या पुस्तकाचं नाव आहे 'करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल'. या पुस्तकात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर पुस्तकाच्या लाँचिंग कार्यक्रमात करीनाने अनेक गोष्टींपासून पडदा काढून टाकला आहे. करीनाच्या मते, तिच्या गर्भधारणेदरम्यान सैफ अली खानने तिची खूप काळजी घेतली. त्याचबरोबर तिने लैंगिक जीवनाबद्दल अनेक गोष्टीही सांगितल्या आहेत.
'स्त्रियांची मनःस्थिती बदलते'
करीना कपूर म्हणाली, 'गरोदरपणात महिलेचा मूड स्विंग होतो. क्षणोक्षणी भावना बदलतात. काही दिवस तुम्हाला छान वाटतात. सैफ म्हणायचा की मी खूप सुंदर दिसत आहे. त्याचवेळी, सहा ते सात महिन्यांनंतर ती खूप थकली होती. मात्र, पत्नीला सुंदर दिसण्यासाठी दबाव आणत नाही किंवा लैंगिक जीवन खूप सक्रिय असेल अशी अपेक्षा नकरणारा एक पती असणं महत्वाचं आहे.
करीना कपूरने सांगितलं, स्त्रीच्या भावना महत्त्वाच्या आहेत
करीना कपूर पुढे म्हणाली, 'गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या भावना सर्वात वर असाव्यात. स्त्रीला काय वाटत आणि विशेषतः त्यावेळी तिला काय वाटते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. जर तुमचा नवरा या सगळ्याकडे लक्ष देत नसेल, तर तुम्ही कल्पना करू शकता की तो आपल्या मुलासाठी कोणत्या प्रकारचा वडील असेल. त्याने तुमच्यावर प्रत्येक गोष्टीवर प्रेम केलं पाहिजे.
दोन मुलांचे आईवडील
सैफ अली खान आणि करीना कपूर 16 ऑक्टोबर 2012 रोजी विवाहबद्ध झाले. आता दोघंही दोन मुलांचे पालक आहेत, ज्यांची नावं तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान आहेत. लहान मुलाचं नाव दोन दिवसांपूर्वीच डिक्लेअर करण्यात आलं आहे. त्याचवर्षी करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला, त्यानंतर तिने तिच्या गर्भधारणेची संपूर्ण स्टोरी तिच्या पुस्तकाच्या रूपात लोकांसमोर मांडली.