मुंबई : प्रवाशांना अडचणीच्या काळात तात्काळ मदत मिळावी यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयानं टोल फ्री नंबर १५१२ ही नवीन हेल्पलाईन सुरु केलीये.
रेल्वे प्रवाशांना तक्रार किंवा मदत घ्यायची असल्यास ते या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधु शकतील. पोलीस महासंचालक श्री सतीश माथुर यांच्या हस्ते सदर टोल फ्री हेल्पलाईनचं उदघाटन करण्यात आलं.
त्यापूर्वी एल्फिन्स्टन-परळ पूल दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी या पूर्वीचे हेल्पलाईन नंबर आणखी काही दिवस सुरू राहतील.