पब्जीचा नाद लागली वाट, घरातच केली लाखोंची चोरी

मुलाकडे दुर्लक्ष करण्याचा मोठा फटका हा या पालकांना सहन करावा लागलाय.

Updated: Aug 28, 2021, 10:02 PM IST
पब्जीचा नाद लागली वाट, घरातच केली लाखोंची चोरी title=

मुंबई : पब्जी (PUBG) खेळानं अनेक घरांचा अक्षरशः खेळखंडोबा केलाय. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतल्या जोगेश्वरीत समोर आलाय. आपला मुलगा काय करतो, याकडे आई वडिलांनी लक्षच दिलं नाही. मुलाकडे दुर्लक्ष करण्याचा मोठा फटका हा या पालकांना सहन करावा लागलाय. हा प्रकार घडलाय मुंबई उपनगरात नक्की हा प्रकार काय आणि किती रुपयांचा फटका या पब्जीपाई बसला आहे पाहुयात. (16 year old boy spent Rs 10 lakh from his parents bank account while playing Pubg in Mumbai)   

पब्जी गेमनं कित्येक मुलांची, घरांची वाट लावली तरी या पब्जीचा नाद काही सुटत नाहीये. जोगेश्वरीमध्ये राहणाऱ्या 16 वर्षांच्या मुलाला पब्जी खेळण्याचं अक्षरशः व्यसन होतं. पब्जी खेळता खेळता त्यानं आई वडिलांच्या अकाऊण्टमधून तब्बल १० लाख खर्च केलं. पैसे संपल्यावर मुलगा घाबरला. तो घर सोडून पळून गेला. जाताजाता त्यानं चिठ्ठी लिहिली. जोपर्यंत कमवत नाही, तोपर्यंत परतणार नाही. अल्पवयीन मुलगा असल्यानं पोलिसांना अपहरणाचा संशय आला.

हा मुलगा अभ्यासासाठी आईचा मोबाईल वापरायचा. तो पब्जी खेळू लागला. विविध टास्कच्या नादात त्याने आईच्या मोबाईलमधून अकाऊण्टमधले तब्बल १० लाख खर्च केले. त्यामुळे अकाऊण्टला मोबाईल लिंक असेल तर काळजी घ्या. वारंवार अकाऊण्ट डिटेल्स चेक करत राहा. 

या मुलाला पोलिसांनी १२ तासांच्या आत शोधून काढलं. त्याचं काऊन्सिलिंग करुन त्याच्या आईवडिलांकडे सोपवलंय. पब्जीनं अनेक घरांचं वाट्टोळं केलंय.  ती वेळ तुमच्यावर येऊ नये, असं वाटत असेल तर मुलांवर नीट लक्ष ठेवा.