धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा दिडशेपार, अशी झाली होती सुरुवात

धारावीत एकूण १६८ जणांना कोरोनाची लागण

Updated: Apr 21, 2020, 09:49 AM IST
धारावीत कोरोना रुग्णांचा आकडा दिडशेपार, अशी झाली होती सुरुवात title=

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी ही कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. इथे कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काल धारावीत ३० नव्यो रुग्णांची भर पडली असून आता धारावीतील आकडा दिडशेपार गेला आहे. धारावीत एकूण १६८ जणांना कोरोनाची लागण झाली. तर आतापर्यंत ११ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 

धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची विविध कारणे समोर येत आहेत. पण याची सुरुवात कुठून झाली हे जाणून घेऊया.

धारावीत सर्वात पहिला सापडलेला कोरोना रुग्ण गार्मेंट फॅक्टरीचा मालक होता. निजामुद्दीन मरकजमध्ये भाग घेणारे दहाजण त्याच्या रिकाम्या खोलीत राहायला आले होते. केरळला जाण्याआधी २२ ते २४ मार्च दरम्यान हे दहाजण त्याच्या खोलीत राहीले होते. कदाचित यांच्या संपर्कात आल्याने त्या मालकाला कोरोना झाल्याची शक्यता आहे. १ एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. 

यासोबतच धारावीत राहणाऱ्या एका डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान एका नर्सला देखील कोरोनाची लागण झाली. अशा विविध मार्गातून कोरोना धारावीत शिव

नागरिकांच्या रॅपिड टेस्ट

आतापर्यंत धारावीतील मुस्लिमनगरमध्ये सर्वाधिक २१ तर मुकूंदनगरमध्ये १८ रुग्ण आढळून आले आहेत. तर डॉ. बालिगा नगर आणि सोशल नगरमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. धारावीतील अनेक परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहेत. धारावीतील कोरोनाबाधितांच्या या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची डोकेदुखी वाढली आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही.