घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत

Independence Day Offer :  ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय. 

नेहा चौधरी | Updated: Aug 15, 2024, 12:08 PM IST
घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत  title=

Independence Day Offer : आपलं हक्काच आणि स्वत:च घर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी असंख्य लोक अहोरात्र मेहनत करतात. पण आता तुमचे हे स्वप्न साकार करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. रिअल इस्टेट कंपनी टाटा हाउसिंग डेव्हलपमेंटने (Tata Housing) स्वातंत्र्य दिनानिमित्त (exclusive Independence Day offers) काही प्रकल्पांमध्ये ग्राहकांसाठी सूट जाहीर केलीय. यामध्ये मुद्रांक शुल्कात कपात आणि इतर अनेक लाभ तुम्हाला मिळणार आहे. कंपनीने एक निवेदन जाहीर केलं असून त्यात दक्षिण आणि पश्चिम भारतातील आपल्या लक्झरी प्रकल्पांवर स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ऑफर घोषित केलीय. कंपनीने सांगितलंय की जेव्हा घरांची मागणी खूप जास्त असते तेव्हा खरेदीदारांसाठी घर खरेदी करणे सोपे आणि फायदेशीर करण्यासाठी कंपनी मुद्रांक शुल्कासारख्या मोठ्या सवलती देत असता. 

कुठे आहेत ही सवलत आणि काय आहे ऑफर?

टाटा हाऊसिंगचा पश्चिम विभागातील ठाण्यातील 'सेरीन' प्रकल्प मुद्रांक शुल्कावर 19 लाख रुपयांपर्यंतची मोठी बचत तुम्ही करु शकणार आहात. टाटा हाऊसिंगचा कल्याणमधील 'अमंत्रा' प्रकल्प पहिल्या 25 घर खरेदीदारांना मुद्रांक शुल्कावर 4 लाख रुपयांपर्यंत बचतीची संधी मिळणार आहे. याशिवाय पुण्यातील टाटा व्हॅल्यू होम्सच्या 'सेन्स 66' प्रकल्पात सुलभ पेमेंट योजना उपलब्ध करुन देण्यात आलीय. दक्षिणेतील कोचीमधील टाटा रियल्टीचा 'त्रितम' प्रकल्प घर खरेदीदारांना शून्य मुद्रांक शुल्काचा मोठा लाभ देण्यात येणार आहे. 

बेंगळुरूच्या 'न्यू हेवन' प्रकल्पात 3 लाख रुपयांपर्यंतचे फर्निचर व्हाउचर देण्यात येणार आहे. कोलकातामधील टाटा हाऊसिंगच्या '88 ईस्ट' प्रकल्पात तळमजल्यावर 10 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. मात्र ही ऑफर फक्त 7 व्या मजल्यापर्यंत लागू असणार आहे. उत्तर प्रदेशात, कसौलीजवळ टाटा हाऊसिंगच्या 'मिस्ट' प्रकल्पात 3 BHK अपार्टमेंट्स खरेदी केल्यास ग्राहकांना रु. 15 लाखांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत. 

सार्थक सेठ, SVP आणि मुख्य विपणन आणि विक्री कार्यालय, Tata Realty and Infrastructure Limited यांनी सांगितलंय की, स्वातंत्र्य दिनाच्या ऑफरची रचना घर खरेदीदारांना मोठा आर्थिक लाभ देण्यासाठी करण्यात आलीय. ज्यामुळे त्यांचे स्वप्नातील घर खरेदी करणे सोपे होणार आहे. टाटा हाउसिंग डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड ही टाटा रियल्टी आणि इन्फ्रा लिमिटेडची उपकंपनी आहे. कंपनीचे भारत, श्रीलंका आणि मालदीवमधील प्रमुख शहरांमध्ये 33 पेक्षा जास्त प्रकल्प असून ज्यांची एकूण विकास क्षमता 51 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त आहे.