नवी आशा, नवं चैतन्य घेऊन उगवला २०१८ चा सूर्य

सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात 2018 या वर्षाचं उत्साहात, जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाचा पहिलाच सूर्यादय झालाय. सूर्य तोच... मात्र प्रकाशकिरणं नवी असतील. नव्या आशा, नव्या आकांक्षा आणि नव तेजाची ही सूर्यकिरणं... 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 1, 2018, 08:29 AM IST
नवी आशा, नवं चैतन्य घेऊन उगवला २०१८ चा सूर्य title=

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात 2018 या वर्षाचं उत्साहात, जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाचा पहिलाच सूर्यादय झालाय. सूर्य तोच... मात्र प्रकाशकिरणं नवी असतील. नव्या आशा, नव्या आकांक्षा आणि नव तेजाची ही सूर्यकिरणं... 

आनंद, समाधानाने नवीन वर्ष काठोकाठ भरलेले असावं असं सांगणारा आणि चैतन्याची नवऊर्जा निर्माण करणारा जणू हा काही सूर्यादय... या सूर्यादयाच्या साक्षीने आपणही नववर्षाचे स्वागत करुया... 

नवी स्वप्नं, नव्या आशा आणि नवी उमेद घेऊन वर्ष 2018 चं आगमन झालं आहे. तमाम भारतवासीयांसह संपूर्ण जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. 

नाच गाणी आणि फटाक्यांची आतशबाजी करत, प्रत्येकाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. भूतकाळात जमा झालेल्या 2017 वर्षामधल्या कडूगोड आठवणींची शिदोरी सोबत घेऊन, प्रत्येक जण मोठ्या उत्साहानं नव्या 2018 वर्षामध्ये दाखल झाला आहे. याच सळसळत्या उत्साहानं नववर्ष 2018 चं धुमधडाक्यात सर्वत्र स्वागत केलं गेलं.