अरबी समुद्रातून २६४ मच्छिमारांची सुटका

चक्रीवादळामुळे सध्या समुद्र खवळलेला आहे.

Updated: Dec 5, 2019, 08:44 AM IST
अरबी समुद्रातून २६४ मच्छिमारांची सुटका

मुंबई : अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुटका केली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सध्या समुद्र खवळलेला आहे. हे मच्छीमार ३ डिसेंबरला समुद्रात अडकले होते. सुटकेचं हे थरारनाट्य अजूनही सुरूच आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहार, समर, सावित्रीबाई फुले, अमल, अपूर्व या नौका रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आहेत. तटरक्षक दलाची डॉर्निअर टेहळणी विमानंही तैनात आहेत. 

गेले तीन दिवस हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या किनारपट्टीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात मच्छिमारांच्या बोटी अडकल्या आहेत. 

समुद्रात छोटं वादळ निर्माण झालं असलं तरी समुद्रात सोसाट्याचा वरा आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छिमारांनी मदत मागीतली आहे. तर तटरक्षक दलाच्या नौका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 

या वादळाचा प्रभाव थेट महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांच्या किनारपट्टीवर जाणवत आहे. विमान आणि हेलिकॉप्टरच्या मध्यमातून देखील मच्छीमारांची सुटका करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत ३०० पेक्षा जास्त मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे.