राज्यात आज 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद

राज्यात आज 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Updated: May 14, 2021, 09:51 PM IST
राज्यात आज 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद  title=

मुंबई : राज्यात आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 695 रूग्णांचं निधन झालं आहे. त्याचप्रमाणे 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 53 लाख 9 हजार 215 इतकी आहे. तर आतापर्यंत एकुण 79 हजार 552 रूणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

राज्याप्रमाणे मुंबईत देखील कोरोना रूग्णांचा आकडा मंदावत आहे. आज  मुंबईत 1 हजार 657 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून 62 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर आज 2 हजार 572 रूग्णांची कोरोनावर मात केली आहे.  उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 6 लाख 85 हजार 705 इतकी आहे. तर आता पर्यंत एकुण 14 हजार 138 रूणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 558 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज 563 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 767 इतकी आहे. आज 20 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात आज 681 कोरोना बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या  1 लाख 33 हजार 893 आहे. जिल्हात आज 9 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.