घाटकोपरमध्ये ४ वर्षांची मुलगी गटारात पडून बेपत्ता, शोधकार्य सुरु

रमाबाई नगरमधील डी बी पवार चौक येथे ही घटना घडली. 

Updated: Jul 13, 2018, 08:35 PM IST
घाटकोपरमध्ये ४ वर्षांची मुलगी गटारात पडून बेपत्ता, शोधकार्य सुरु title=

मुंबई: घाटकोपर येथील रमाबाई नगर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी चार वर्षांची एक मुलगी गटारात पडल्याची दुर्घटना घडली. गटारात पडल्यानंतर ही मुलगी बेपत्ता झाली आहे. त्यामुळे या मुलीला शोधण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान या मुलीचा शोध घेत आहेत. 

रमाबाई नगरमधील डी बी पवार चौक येथे ही घटना घडली. हे गटार अत्यंत निमुळते आहे. मात्र, ही मुलगी लहान असल्यामुळे गटारातील मोकळ्या जागेतून आतमध्ये वाहून गेली. ही गोष्ट लक्षात येताच स्थानिकांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यामध्ये यश आले नाही.