close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एलटीटी स्थानकावरुन तिकिटांचे तब्बल 44 लाख रुपये चोरीला

तिकीट घरातूनच तिकीटाचे लाखो रुपये चोरीला

Updated: Sep 23, 2019, 04:54 PM IST
एलटीटी स्थानकावरुन तिकिटांचे तब्बल 44 लाख रुपये चोरीला

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथील प्रवाशांच्या तिकिटांचे तब्बल 44 लाख रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी 4 ते रात्री 12 च्या दरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिकीटघर मधील तिजोरीतुन हे पैसे चोरीला गेले आहेत. त्यामुळे ही चोरी कोणी केली याचा तपास पोलीस करीत आहे. 

काल संध्याकाळी एका व्यवस्थापकाने दुसऱ्या व्यवस्थापनाकडे चार्ज दिल्यानंतर, तिजोरीतून 44 लाख रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही घटना रात्री उघडकीस आली. याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. 

या प्रकरणात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का? सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबीने याचा तपास सुरू असून गुन्हा कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.