मुंबई : मुंबईच्या प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकानं हातचलाखीनं कॅशिअरकडून ४६ हजार रूपये काढून घेतले आहेत. हातचलाखीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
हॉटेलमध्ये कॅशिअरकडून आरोपीने १००० यूएई करेंसी बदलण्याची मागणी केली. कॅशियरने चेंज देण्यास नकार दिला. कॅशिअरने म्हटलं की, तुम्ही या हॉटेलमध्ये राहत नाही आहेत म्हणून तुम्हाला चेंज देता येणार नाही. त्यानंतर या व्यक्तीने आपण यूएई नागरिक असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्याने २००० च्या नोटांचा बंडल पाहण्यासाठी मागितला.
आरोपीने २ हजाराच्या त्या बंडलमधून २३ नोटा लंपास केल्या. त्यानंतर तेथून निघून गेला. उशीरा रात्री पैशांचा हिशोब सुरु असताना ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे.
पाहा व्हिडिओ