...आणि चर्चगेट स्टेशनवर ५ दिवसांची मुलगी सापडली

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये ५ दिवसांची बेवारस मुलगी सापडली आहे. 

Updated: Jun 27, 2018, 03:43 PM IST
...आणि चर्चगेट स्टेशनवर ५ दिवसांची मुलगी सापडली title=

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये ५ दिवसांची बेवारस मुलगी सापडली आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, चर्चगेट जीआरपीतून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशनवर जीआरपीची टीम गस्त घालत असताना त्यांना लोकल ट्रेनच्या एक डब्यात कपड्यात लपेटलेली एक पोटली दिसली. जीआरपीच्या जवानाने तपासणीसाठी ती पोटली उघडली. तेव्हा संपूर्ण टीम स्तब्ध झाली. कारण त्या पोटलीत काही दिवसांची मुलगी होती. तिची प्रकृती खूपच खराब होती. त्यानंतर जीआरपीने ताबडतोब या प्रकरणाची खबर कंट्रोल रुमला दिली आणि बाळाला जे.जे. रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्या बाळाला आईच्या दुधातून मिळणारा आहार आणि औषध देण्यात आले. सध्या मुलीची तब्येत स्थिर आहे. पण पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 

5 days old newborn girl found in churchgate local