सातवा वेतन आयोग: राज्य कर्मचाऱ्यांना सरकारकडून खूशखबर!

सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीस राज्य सरकारची मंजूरी

Updated: Aug 5, 2018, 09:20 AM IST
सातवा वेतन आयोग: राज्य कर्मचाऱ्यांना सरकारकडून खूशखबर! title=

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. गेल्या काही महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील १९ लाख शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल चार हजार कोटी रुपयांची अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

गणपती उत्सवापूर्वी मिळणार रक्कम

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना  किमान २५ हजार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम गणपती उत्सवापूर्वी देण्यात येणार असून, महागाई भत्त्यापोटीची १४ महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

नियोजित संप मागे घेण्याचे संकेत

दरम्यान, कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेला मंगळवारपासूनचा आपला नियोजित संपही मागे घेण्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेली बैठकही सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले.