९७ टक्के बेस्ट कर्मचाऱ्यांचं संपाच्या बाजूने मत

बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत असतानाच आता कर्मचा-यांच्या संपाचे सावट घोंगावत आहे. ९७ टक्के बेस्ट कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे. संप करावा की नाही यासाठी सर्व बेस्ट डेपोमध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या वतीनं मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Updated: Jul 19, 2017, 04:36 PM IST
९७ टक्के बेस्ट कर्मचाऱ्यांचं संपाच्या बाजूने मत title=

मुंबई : बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत असतानाच आता कर्मचा-यांच्या संपाचे सावट घोंगावत आहे. ९७ टक्के बेस्ट कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे. संप करावा की नाही यासाठी सर्व बेस्ट डेपोमध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या वतीनं मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मंगळवारी एकूण १९०९४ कर्मचा-यांनी मतदान केले होते. यापैकी १८५३७ कर्मचा-यांचे मत 'संप करावा'च्या बाजूने तर केवळ ४९६ कर्मचा-यांचे मत ' संप करू नये' या बाजूने झाले आहे. यानंतर आता बेस्ट संयुक्त कृती समिती संपासंदर्भात दोन दिवसांत पुढील दिशा ठरवणार आहे.