भिवंडी : भिवंडीत चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी वस्ती भागातील ही इमारत कोसळली आहे. या कोसळलेल्या इमारतीतून पाच नागरिकांना सुखरूप काढण्यात आलं आहे. तर पोलीस दल आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनस्थळी दाखल झाल्यात. अनेकजण इमारतीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
A portion of a three floor building collapses in Maharashtra's Bhiwandi. 1 dead and 3 injured. Rescue teams at the spot pic.twitter.com/w18g8sp2Xc
— ANI (@ANI) November 24, 2017
A portion of a three floor building collapses in #Maharashtra's Bhiwandi. 1 dead and 3 injured. Rescue teams at the spot. pic.twitter.com/XwuLcVLTkg
— ANI (@ANI) November 24, 2017
इमारत कोसळल्याने एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे तर अनेकजण जखमी झाल्याचं समजतं. तर १५ ते २० जण या इमारतीखाली दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी मतदकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. केवळ १० ते १२ वर्ष जुनी ही इमारत होती.
दरम्यान, मुंबईतील घाटकोपरमध्येही अशीच एक जुनी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा अशी घटना घडल्याने इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.