'रेल्वे भरती परीक्षेतून मराठी उमेदवारांना हाकललं'

या प्रकाराबाबत शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

Updated: Oct 5, 2018, 01:29 PM IST
'रेल्वे भरती परीक्षेतून मराठी उमेदवारांना हाकललं'  title=

मुंबई : रेल्वे भरती मंडळाने ड  श्रेणीच्या ६४ हजार जागांसाठी  बुधवारपासून देशभरात ऑन लाईन परीक्षा घेतली जात आहे. त्याकरिता पुणे  न्हने केंद्रावर परीक्षा  देण्यास गेलेल्या  अनेक मराठी उमेदवारांना परीक्षा देण्यास मनाई करून हाकलून दिल्याचा आरोप शिवसेनेनं केलायं.

शिवसेनेचा मोर्चा

या प्रकाराबाबत शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

रेल्वे मधील नोकरभरतीत मराठी उमेदवारावर सातत्याने होणाऱ्या या  अन्यायाविरोधात आवाज उठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतंय.

शिवसेना प्रणित स्थानीय लोंकाधिकार समिती महासंघतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सेंट्रल येथील रेल्वे  भरती मंडळाच्या कार्यलयावर आज दुपारी धडक देऊन जाब विचारण्यात येणार आहे.