Aryan Khan Clean Chit : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने क्लिन चीट दिली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे .
समीर वानखेडेंवर कारवाई यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंनी जो तपास केला. त्या तपासात अनेक त्रुटी असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे NCBच्या दक्षता पथकाकडून चौकशी करण्यात आलीय. याच समितीचा अहवाल NCBकडून सादर केला जाणार आहे.
एनसीबीने क्रूझवर टाकलेल्या छाप्याच्या कारवाईत अनियमितता असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर, या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे देण्यात आला होता.
समीर वानखेडे यांना सध्या एनसीबीतून हटवण्यात आले असून त्यांची रवानगी डीआरआयमध्ये करण्यात आलेली आहे.
आर्यन खानला क्लिन चीट
आर्यन खानला एनसीबीने क्लिनचीट दिलीय. ड्रग्जप्रकरणी एनसीबीने मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. त्यात आर्यन खानविरोधात सबळ पुरावे न सापडल्याचं नमूद केलंय. आर्यन आणि मोहक यांच्याकडे अंमली पदार्थ सापडले नाहीत असं य़ा चार्जशीटमध्ये म्हटलंय.
एकण 10 खंडांचं आरोपपत्र एनसीबीने सादर केलंय. या प्रकरणात विशेष एनसीबी एसआयटी तपास करत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली होती. 14 आरोपींविरोधात केस दाखल करण्यात आलीय. तर 6 जणांविरोधात ठोस पुरावे न सापडल्याने कारवाई करण्यात आलेली नाही.