Mumbai Drugs Case: आर्यन खानला क्लीन चिट, समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात सॉरी...

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला दिलासा मिळाल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे  यांची पहिली प्रतिक्रिया...

Updated: May 27, 2022, 03:59 PM IST
Mumbai Drugs Case: आर्यन खानला क्लीन चिट, समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात सॉरी... title=

Aryan Khan : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान याला दिलासा मिळाल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

या प्रकरणी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सॉरी असं म्हटलं. 'मी आता एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे या विषयावर बोलू शकत नाही. यासाठी तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे. 

या संपूर्ण प्रकरणात आर्यन खानला 28 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. या प्रकरणात आर्यन खानसह सहा जणांविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सुरुवातीच्या प्रकरणात काही उणिवा आढळून आल्या आणि पहिल्या तपास पथकाकडून चुका झाल्याचं एनसीबीने मान्य केलं. 

एनडीपीएस कोर्टात एनसीबीने सुमारे सहा हजार पानांचे आरोपपत्र सादर केलं आणि त्यात आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली. बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान व्यतिरिक्त, अवीन शाहू, गोपाल जी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल यांच्याविरुद्ध पुराव्याअभावी ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. 

आर्यनला ऑक्टोबर 2021 च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणीनंतर 28 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.