मुंबई : एलफिन्स्टन स्टेशन येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही प्रवाशांच्या मनावर झालेल्या दुर्घटनेचा आघात अद्याप कायम आहे. या दुर्घटनेत 23 जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने उपाययोजनांची खैरात केली.
पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्यांची दखल घेत प्रवासी सुरक्षिततेनुरूप बदल करण्यास सुरूवात केली आहे. सर्व स्थानकांत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्याचबरोबर पादचारी पुलासाठी 245 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पादचारी पुलावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या डब्ब्यात टॉकबॅक यंत्रणा 15 महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची खैरात केली असली तरी महिना उटलटा तरी अद्याप या उपाययोजना कागदावरच आहेत.