मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाची आजची मुदत अखेर टळलीय. विद्यापीठाचे सर्व निकाल ५ ऑगस्टपर्यंत लागणार असल्याची कबुली विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम ए खान यांनी झी २४ तासला दिलीय. त्यामुळे आता सर्व निकाल ५ ऑगस्टपर्यंत रखडले आहेत.
राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं विद्यापीठाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र आज सर्व निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आलंय.
त्याआधी रात्री उशिरा जवळपास १५३ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. आर्ट्सच्या ७८, कॉमर्सच्या ७, सायन्सच्या १०, व्यवस्थापनाच्या १०, तंत्रज्ञान ४८ विषयांचा यामध्ये समावेश आहे. अजूनही जवळपास तीन लाख उत्तरप्रत्रिका तापसणी बाकी असल्याची माहिती विद्यापीठानं दिलीय.