लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या 'आरोग्योत्सव' उपक्रमाचं बिग बींकडून कौतुक

मंडळाचं यंदाचं ८७ वे वर्ष 

Updated: Sep 2, 2020, 09:06 AM IST
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या 'आरोग्योत्सव' उपक्रमाचं बिग बींकडून कौतुक  title=

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीची स्थापना न करता. 'आरोग्योत्सव' साजरा केला. आयोजीत केलेल्या 'आरोग्योत्सव' मध्ये २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केलं. तर १०,२७६ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. गणेशोत्सवात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या "आरोग्यत्सव"  सामजिक उपक्रमांबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी मंडळाचं कौतुक केलं आहे. 

अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी साऱ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यंदा महामारीमुळे लालाबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही. यंदा त्यांनी मुर्तीची स्थापना न करता समाज कल्याणाचा उपक्रम राबवत आहे. 'आरोग्योत्सव' साजरा करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या या उपक्रमाला बच्चन कुटुंबियांकडून शुभेच्छा देत आहोत. प्लाझ्मा थेरपीकरता त्यांनी उचलेलं पाऊल हे कौतुकास्पद आहे. 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'* नमस्कार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना...

Posted by Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal on Tuesday, September 1, 2020

मंडळाच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरून ही पोस्ट करण्यात आली आहे. आपल्याला माहितच आहे दरवर्षी लालाबागचा राजाच्या दर्शनाकरता अनेक कलाकार येतात. यामध्ये 'बच्चन' कुटुंबियांचा देखील समावेश आहे. कोरोनाच्या काळात सार्वजनिक उत्सव न करता आरोग्योतस्व साजरा करण्याचा मंडळांचा निर्णय आहे. कोरोनाचं सावट हे बच्चन कुटुंबियावर देखील आलं होतं. अमिताभ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना सर्वात प्रथम लागण झाली. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या अभिषेक बच्चनला कोरोनाची लागण झाली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x