अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारायण मुंबई पोलिसांकडून निलंबित

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करणारे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारायण यांना मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे.

Updated: Feb 15, 2022, 11:04 PM IST
अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारायण मुंबई पोलिसांकडून निलंबित title=

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करणारे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र नारायण यांना मुंबई पोलिसांनी निलंबित केले आहे. जितेंद्र नारायण हे अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत असताना संबंधित अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता 4 वेळा परदेश प्रवास केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

जितेंद्र नारायण यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तीन वेळा घरे खरेदी करून विकली. याची माहिती ही त्यांनी मुंबई पोलिसांना दिली नव्हती. अशी माहिती देखील पुढे आली आहे. 

जितेंद्र शिंदे यांनी कोणतीही माहिती न देता दुबई आणि सिंगापोरला प्रवास केल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली आहे. तसेच त्यांच्यावर सुट्टीवर बाहेर जाताना खोटी माहिती दिल्याचा ही आरोप आहे. चौकशीमध्ये दोषी ठरल्याने त्यांना निलंबित करण्यात आलंय.

अमिताभ बच्चन हे देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. ज्यांची सुरक्षा ही सरकारची मोठी जबाबदारी आहे.