देशातील सर्वात जास्त महाग पेट्रोल महाराष्ट्रातील या शहरात

तुम्हाला धक्का बसेल, मुंबई नाही, पुणे नाही, दिल्लीतही नाही, एवढा सर्वात जास्त पेट्रोल दर देशात सर्वात जास्त, महाराष्ट्रातील या शहरात आहे.

Updated: Sep 6, 2018, 01:47 PM IST
देशातील सर्वात जास्त महाग पेट्रोल महाराष्ट्रातील या शहरात title=

मुंबई : तुम्हाला धक्का बसेल, मुंबई नाही, पुणे नाही, दिल्लीतही नाही, एवढा सर्वात जास्त पेट्रोल दर देशात सर्वात जास्त, महाराष्ट्रातील या शहरात आहे. पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार हा दर महाराष्ट्रातील अमरावती शहरात सर्वात जास्त प्रति लिटर ८८ रूपये लीटर एवढा आहे.

पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लीटर ८६ रूपये ६१ पैसे आहे. तर डिझेलचा प्रति लीटर ७४ रूपये ४७ पैसे एवढा आहे. यावर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. अखेर सर्वसामान्य नागरिकाच्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीपर्यंत पोहचण्यासाठी त्याची किंमत होते, प्रति लीटर ८६ रूपये ६१ पैसे.

महाराष्ट्रात पेट्रोलला लीटर मागे १४ रूपये ७२ पैसे व्हॅट आहे. तसेच यात आणखी ९ रूपये राज्याचा सेस असतो. यात लीटरमागे ३ रूपये १६ पैसे वितरकाचं कमिशन आहे.

डिझेलच्या बाबतीतही तसंच आहे, डिझेल ७४ रूपये ४७ पैसे प्रति लीटर आहे. यात प्रति लीटर पुढील टॅक्सचा समावेश आहे. डिझेलसाठी व्हॅट आहे १२ रूपये २० पैसे. तर राज्याचा सेस आहे १ रूपया आणि वितरकाचं कमिशन आहे २ रूपये ३ पैसे.

इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत जास्त आहे, यातील नेमका फरक आपण पाहिला तर, महाराष्ट्रात राज्याचा सेस आणि व्हॅट जास्त आहे. जर महाराष्ट्रात सेस रद्द करण्यात आला, आणि व्हॅट कमी करण्यात आला, तर पेट्रोल प्रति लीटर १० रूपयांनी स्वस्त होऊ शकतं, असं ऑल इंडिया पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशनचे, राष्ट्रीय प्रवक्ते, अली दारूवाला यांनी म्हटलंय.

सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी म्हटलंय, हायवेच्या बाजूला असलेली दारूची दुकानं बंद झाली, यात महसुलाचा तोटा भरून काढण्यासाठी ३ रूपये सेस लावण्यात आला होता, पण यानंतर हायवेच्या बाजूच्या दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला तरी देखील, या ३ रूपये सेस कायम ठेवण्यात आला आहे.