Anant Ambani-Radhika Engagement: इशा अंबानीने भावाला दिलं सरप्राईज, अंगठी घेऊन पोहोचला खास पाहुणा; पाहा व्हिडीओ

उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या साखरपुडा सोहळ्यात अंबानी कुटुंबाने केलेला डान्स सध्या चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान साखरपुड्यात इशा अंबानीने भावाला सरप्राईज दिलं.  

Updated: Jan 20, 2023, 03:27 PM IST
Anant Ambani-Radhika Engagement: इशा अंबानीने भावाला दिलं सरप्राईज, अंगठी घेऊन पोहोचला खास पाहुणा; पाहा व्हिडीओ title=
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा नुकताच पार पडला

उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या साखरपुड्यासाठी मनोरंजन तसंच क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू, सेलिब्रिटी उपस्थित होते. या साखरपुडा सोहळ्यात मुकेश अंबानी, टीना अंबानी यांच्यासह कुटुंबीयांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान अनंत अंबानीची मोठी बहीण इशा अंबानीने आपल्या भावासाठी एक सरप्राईज ठेवलं होतं. 

साखरपुड्याची अंगठी आणण्यासाठी इशा अंबानीने खास नियोजन केलं होतं. "अंगठी इथे सध्या नाहीये असं दिसत आहे. पण मला वाटतं आपल्याकडे सरप्राईज रिंगबेअरर आहे. कृपया त्याने इथे यावं," असं इशा अंबानी यावेळी म्हणते. यानंतर काही वेळातच त्यांचा श्वान अंगठी घेऊन मंचावर येतो. 

VIDEO : अनंत- राधिका यांच्या साखरपुड्यात अंबानी फॅमिलीने केला सरप्राइज डान्स

व्हिडीओमध्ये कर्मचारी अंबानी कुटुंबाच्या पाळीव श्वानाला पायऱ्यांवरुन आणताना दिसत आहे. अगंठी त्याच्या गळ्याभोवती रिबनच्या सहाय्याने बांधण्यात आली होती. श्वान धावत स्टेजवर आल्यानंतर अनंत आपला भाऊ आकाशच्या मदतीने अंगठी काढून घेतो आणि साखरपुडा संपन्न होतो. 

या साखरपुड्यासाठी शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, सलमान खान, रवणीर सिंग, दिपिका पदुकोन, ऐश्वर्या राय बच्चन, करण जोहर, कतरिना कैफ उपस्थित होते.गुजराती पद्धतीप्रमाणे अनंत आणि राधिका यांचा गोल-धना आणि चुनरीची रस्म करण्यात आली. 

राधिका मर्चंट ही उद्योजक विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. अनंत अंबानीने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं असून रिलायन्स इंडस्ट्रीत कार्यरत आहे.