मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे

गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप अखेर मागे घेण्यात आलाय.

Updated: Oct 6, 2017, 09:26 PM IST
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे  title=

मुंबई : गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप अखेर मागे घेण्यात आलाय. सोमवारपासून सेविका कामावर रूजू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आलाय.

सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढवून देण्यात येणार आहे. यापुढे 6 हजार 500 रुपयांवर 5 टक्के मानधन वाढ लागू होणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी बजेटमध्ये सुधारणा करून मानधन वाढ लागू करण्यात येणार आहे.

पूर्ण समाधानी नसलो तरी सेवा ज्येष्ठता ही प्रमुख मागणी मान्य झाल्यामुळे संप मागे घेत असल्याची घोषणा अंगणवाडी सेविका कृती समितीनं केलीय. तर सध्या राज्यावर आर्थिक ताण असून पुढच्या वर्षी इतर मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. या बैठकीला महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.