जिथे शाहरुखचा वाद तिथे वानखेडे, नक्की काय आहे 'वानखेडे' कनेक्शन?

सोशल मीडियावर शाहरुख खान, वाद आणि वानखेडे कनेक्शनची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Updated: Oct 6, 2021, 04:45 PM IST
जिथे शाहरुखचा वाद तिथे वानखेडे, नक्की काय आहे 'वानखेडे' कनेक्शन? title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने (Narcotics Control Bureau) अटक केली. आर्यनला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाने अटक केली. या सर्व प्रकरणी बॉलिवूडसह अन्य क्षेत्रात एकच खळबल उडाली. तेव्हापासून आतापर्यंत सोशल मीडियावर शाहरुख खान, वाद आणि वानखेडे कनेक्शनची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. शाहरुखचा वाद आणि वानखेडे कनेक्शन काय आहे, ज्याची नेटीझन्स चर्चा करतायेत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Aryan khan detained by officer sameer wankhede and actor sharukh khan was banned form wankhede stadium in 2012)

आर्यन खान, ड्रग्स आणि समीर वानखेडे 

या प्रकरणी आर्यनसह अनेकांना अटक करण्यात आली. अटकेनंतर आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आर्यनला रात्र कोठडीत घालवावी लागली. या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणी ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली त्यांचं नावही वानखेडेच. त्यामुळे नेटकऱ्यांना आयपीएलच्या 12 व्या मोसमात शाहरुखचा सुरक्षारक्षकाशी झालेल्या वादाची आठवण झाली.

 हा जो काही वाद झाला होता, तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच झाला होता. त्यामुळेच जिथे शाहरुखचा वाद तिथे वानखेडे अशी चर्चा रंगू लागली.

आयपीएल 2012 मध्ये वानखेडेत सुरक्षरक्षकाशी वाद

आयपीएलच्या 5 व्या मोसमातील 65 वा साखळी सामना (IPL 2021) हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई विरुद्ध कोलकाता आमनेसामने होते. कोलकाताचा मालक असलेल्या शाहरुखसोबत त्याचे मित्रसुद्धा स्टेडियममध्ये उपस्थित होते. या सामन्यात कोलकाताने मुंबईवर 32 धावांनी दमदार विजय मिळवला. 

या विजयाचा जल्लोष करण्यासाठी शाहरुखचे मित्र हे ग्राऊंडवर जाण्याच्या प्रयत्नात होते. हे तिथे उपस्थित असलेल्या  सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. 

त्या सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावरुन शाहरुखने त्या सुरक्षरक्षकाला हटकलं. यानंतर जे काही झालं, ते उभ्या क्रिकेट विश्वाने पाहिलं. शाहरुखने त्या सुरक्षारक्षकाशी घातलेली हुज्जत कॅमेऱ्यात कैद झाली. या सर्व प्रकारानंतर एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोशिएशनने शाहरुखवर काही वर्षांची बंदी टाकली. मात्र ही बंदी काही काळानंतर उठवण्यातही आली.