मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शुक्रवारी आर्यनसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. या सुनावणी मध्ये न्यायालय काय निर्णय घेतल.. याकडे सर्वांचं लागलं आहे. आर्यनला जामीन मिळण्यासाठी मानेशिंदे यांनी मोठे प्रयत्न केले. आर्यनसह ताब्यात असलेल्या सात जणांना जेजे रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्याला आर्थर जेलमध्ये नेण्यात आलं.
सुनावणी दरम्यान वकील मानेशिंदे अनेक दाखले देत आहेत. त्यामुळे आता आर्यनला जामीन मिळणार की त्याला आणि त्याच्यासह असलेल्या सात जणांना जेल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mumbai | NCB brings Aryan Khan and other accused in the cruise ship drug raid case to Arthur Jail pic.twitter.com/uow3Ukaj0Z
— ANI (@ANI) October 8, 2021
दरम्यान, 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेतले. गुरुवारी आर्यन खानसह 8 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आर्यन खानची गुरूवारची रात्रही जेलमध्येच गेली. आर्यनसह 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानं गुरूवारही त्याला जेलमध्येच मुक्काम करावा लागला. शुक्रवारी रात्री आठही आरोपी NCB कोठडीत होते मात्र NCBला आरोपींची चौकशी करायला मनाई करण्यात आली होती.