धारावीत 8 लाख 17 हजारांची रक्कम पकडली

 निवडणूक आयोगाच्या पथकाला सापडली 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम 

Updated: Oct 9, 2019, 11:43 PM IST
धारावीत 8 लाख 17 हजारांची रक्कम पकडली

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यभरात सुरु आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार सभा घेत, जनतेत जाऊन आश्वासनांची खैरात देत आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगही आपले काम जोरदार बजावत आहे. उमेदवारांना दिलेल्या आचारसंहितेचे पालन होते का? याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शहरातील संशयित गाड्यांवरही नजर ठेवली जात आहे. याच पार्श्वभुमीवर धारावी भागात आज सकाळी दहा वाजता निवडणूक आयोगाच्या पथकाला 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम पकडण्यात यश आले आहे. 

सकाळी सायन जंक्शन जवळ वाहन क्र. MH-04, HX-1116 पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा या वाहनाची तपासणी केला असता धीरेन कांतीलाल छेडा या गृहस्थाच्या गाडीत ही रक्कम सापडली. हा संशयित घाटकोपर पूर्व येथे राहणारा आहे. धारावी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदविल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली.