मीरा भाईंदरमध्ये बंडखोरी, महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढणार

 आमदार नरेंद्र मेहता यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Updated: Oct 5, 2019, 02:50 PM IST
मीरा भाईंदरमध्ये बंडखोरी, महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढणार  title=

मुंबई : मीरा भाईंदरचे महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र मेहता यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहीद मेजर कौस्तुभ राणे चौक अभिवादन करून वाजत गाजत आणि मिरवणूकीच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांना उमेदवारी दिल्याने मिरा भाईंदर माजी महापौर गीता जैन नाराज झाल्या आहेत. तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज गीता जैन यांनी अर्ज दाखल करताना मिरवणूक कढून शक्ती प्रदर्शन केले.

'मोदी तुझसे बैर नही लेकिन मेहता तेरी खैर नही' अशा घोषणा अशा घोषणा गीता जैन यांच्या समर्थकांनी दिल्या. बाळासाहेब कलादानाला भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी विरोध केल्यामुळे नाराज शिवसैनिक आणि नगरसेवकांनी गीता जैन यांना समर्थन दिले. त्यामुळे भाजपा विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.